Breaking News

सम्यक विद्यार्थी आंदोलन बीड शहर महासचिव पदी सारंग जावळेबीड (प्रतिनिधी ) आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात संदर्भात सरकारकडून वेळोवेळी अपेक्षाभंग होत आहेत. शासनाच्या या धोरणाच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे संघटन म्हणजे सम्यक विद्यार्थी आंदोलन होय. के एस के कॉलेज येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन बीड शहर महासचिव पदी सारंग जावळे यांची निवड करण्यात आली पुढे बोलताना प्रकाश उजगरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळामध्ये येणार्‍या समस्या व याविरोधात घ्यावयाची भूमिका विद्यार्थ्यांना समजावून सांगून एससी एसटी ओबीसी व सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रभर संघटन वाढवण्यात येणार असून या संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असे मत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य सदस्य प्रकाश उजगरे यांनी मांडले. यावेळी उपस्थित सोनू साबळे, देवा सोनवणे, करण जाधव,टायगर धनवे, सुहास निकाळजे, आनंद सासने,प्रतीक भोळे, संकेत साबळे, सागर जावळ,आदित्य गायकवाड,अविनाश जाधव, विवेक गलांडे, आकाश साबळे .विक्की तांगडे, नितिन वाघमारे, राहुल वाघमारे,उमाश पटेकर,अजय सर्वे,ओंकार डोंगर, मुकुंत कुटे, अप्पा साबळे,अक्षय शिंदे,आकाश पवार,व अन्य विद्यार्थी उपस्थित होते.