Breaking News

नांदुर्खी बुद्रुकच्या उपसरपंचपदी प्रल्हाद चौधरी


 राहाता/प्रतिनीधी :राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रल्हाद सुदामराव चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे

राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली नांदुर्खी बुद्रुक ग्रामपंचायत तालुक्यात राजकीय दृष्ट्या अग्रेसर व प्रतिष्ठित समजली जाते. या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची जागा या आधीच्या उपसरपंचाने राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती. नुतन उपसरपंच निवड ग्रामपंचायत सभागृहात सोमवार दि.25 रोजी सरपंच विद्या योगेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उपसरपंच पदासाठी प्रल्हाद चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिपाली औटी यांनी प्रल्हाद सुदामराव चौधरी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केली. 

यावेळी बापूसाहेब चौधरी, योगेश चौधरी, संजय चौधरी, संजय कुदळे, दत्तात्रय चौधरी , सतिष दाभाडे, सतीश चौधरी, सुधाकर  चव्हाण, सचिन चौधरी, नवनाथ चौधरी, भाऊसाहेब चौधरी, बच्चू चौधरी, प्राध्यापक कोळगे सर आदी मान्यवर उपस्थित होते.