Breaking News

दिशा व दशा ठरवण्याचे काम येत्या निवडणूकीत करायचे-अशोकराव सोनवणेशेवगाव/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आतापर्यंत पक्षांमध्ये नाते-गोते संभाळण्याचे काम केले आहे. तसेच भाजप हा पक्ष भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येणारी 2019 लोकसभेची निवडणूक ही देशाची व बहुजन समाजाची दिशा व दशा बदलण्याचे काम काम करणारी ठरणारी आहे. त्यामुळे हा महाशक्तींना थांबवण्याचे काम भारीप बहुजन महासंघाला करायचे आहे. त्यासाठी मुस्लिमांसह इतर बहुजनांनी भारिप बहुजन पक्षामध्ये येऊन सावध राहून पक्ष वाढवण्याचे काम करायचे आहे. असे आवाहन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव सोनवणे यांनी केले आहे.
शेवगाव येथे पाथर्डी रोडवरील मगर कॉम्प्लेस येथे भारिप-बहुजन पक्षाची बैठक काल पार पडली. त्यावेळी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनवणे हे बोलत होते.
यावेळी महासचिव सुनील भाऊ शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, अ‍ॅड. जीवन कांबळे, अ‍ॅड. जीवन सरोदे, दत्तू मगर बाळासाहेब गजभिव, शहादेव निळ, वसंतराव साबळे, सतीश ठोंबे, सुनिल साळवे, राजू खर्चन, प्रा.किशोर तुपविहीरे, योगेश खर्चन, सतीश सोनवणे, विकास इंगळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील मान्यवरांच्या जिल्हा व तालुका कार्यकारणीवर निवडी करण्यात आल्या. भारीप तालुकाध्यक्ष विजय मगर, तालुका उपाध्यक्ष संदीप घाडगे, तालुका महासचिव प्रथमेश सोनवणे, संघटक यासीन भाई शेख, भारिप तालुका युवक अध्यक्षपदी किशोर साळवे, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शेखर कळकुंबे, उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, सचिव नीरज दळवी, संघटक ज्ञानेश्‍वर मस्के, प्रसिद्धी प्रमुख गणेश बोरुडे इत्यादी मान्यवरांच्या निवडी करून त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले. व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सोनवणे यांनी केले. तर आभार संतोष पटवेकर यांनी मानले.