Breaking News

एस.टीच्या १५० कामगारांची दंतरोग व रक्तगट तपासणी; कामगार कल्याण केंद्राचा उपक्रम परळी(प्रतिनिधी):- येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने शनिवारी (दि. ९) मोफत दंतरोग व रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १५० कामगारांना मोफत दंतरोग व रक्तगट तपासणी व आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आगार प्रमुख रणजीत राजपूत, कामगारनेते रमेश गित्ते, डॉ. दावर काझी, रेल्वेचे कमर्शियल इंस्पेक्टर अरविंद कुमार, लॅब टेक्नीशियन शेख फेरोज, अनिल बिडवे, मनोहर होळंबे, जी. एस. सौंदळे, केंद्र संचालक आरेफ शेख यांचे उपस्थितीत झाले. दातांच्या विकारावर काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. गुटखा, तंबाखू, पानसुपारी यांच्यामुळे दातांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगून मौखिक आरोग्याचे महत्त्व डॉ. दावर काझी यांनी सांगितले. धूम्रपान व मद्यपान शरीराला घातक आहे. त्यापासून दोनशेहून अधिक आजार होतात. दरवर्षी ६ टक्के मृत्यू दारुमुळे होतात. दारू सेवनाने मेंदूच्या बर्‍याचशा भागावर दुष्परिणाम होतो. दारूमुळे आपले स्वतःचे शरीर तर खराब होतेच आणी आपल्या कुटुंबालाही मोठी हानी होते, असे सामाजिक कार्यकर्ते मनोहर होळंबे यावेळी म्हणाले. जी. एस. सौंदळे, अरविंद कुमार यांनी मनोगत व्यक्त केले.