Breaking News

कुंबेफळ-बनकारंजा रस्त्याचे काम निकृष्ट गावकर्‍यांनी अडवले काम


अंाबाजोगाई (प्रतिनिधी) :-मुख्यमंञी ग्रामसडक योजने अंतर्गत सुरू असलेला जवळ कुंबेफळ-बनकरंजा-तें मुलेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होतं असल्याची तक्रार करत बनकरंजा गावच्या गावकर्‍यांनी काम बंद पाडलें आहें. ...चांगले काम करा अन्यथा काम करु देणार नाही असा पवित्रा घेतला आहें... मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १३ किलोमीटर चे ७ कोटी ६८लाख रुपयाचे काम सुरू आहें.. वीस वर्षानंतर या रस्त्याचा वनवास फिटनार आहे,या रस्त्यासाठी उपोषण आंदोलन केल त्यामूळे आत्ता मंजूर झालेला रस्ता जर निकृष्ट दर्जाचा होतं असेल तर काम होवू देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहें...

तसेच रस्त्याच्या कामत इस्टिमेट प्रमाणे काम होतं नसल्याने तत्काळ काम बंद करा अशी मागणी केली.. या बाबतीत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रनेच्या अधिकार्‍याना तक्रार करुन देखील अधिकारी गुंतेदाराला पाठीशी घालत आहेत असा आरोप देखील गावकरी करत आहेत...या बाबतीत अधिकार्‍यांशी विचारलं असता... बोलण्यास नकार दिला.. ग्रामविकास मंत्री ना.पंकजा मुंडेच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामत लक्ष घालावे अशी मागणी केली...जात आहें.रस्त्याच्या बाबतीत बोगस काम खपवून घेणार नसल्याचे गावकरी सांगत आहेत, या रस्त्याचं काम नुकतंच सुरू झालं आहे, मात्र चांगले काम करुन घेन्यासाठी गावकरी पुढे येत आहेत यांमुळे रस्ते आणी शासकीय योजनां राबवताना गुंतेदार आणी अधिकारी यांच्यावर जरब बसणार आहे