Breaking News

पारनेर तहसिल गेटसमोर वाहतूक कोंडी


पारनेर/प्रतिनिधी
पारनेर शहरातील शासकिय तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाच्याच्या गेटसमोरच अनधिकृरित्या वाहन धारक चारचाकीदुचाकी वाहने बेशिस्त पध्दतीने लावत असल्याने रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी होऊन सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अवघ्या काही अंतरावर पारनेर पोलिस स्टेशन आहे. तरीदेखील या नागरी समस्यांकडे पोलिस प्रशासन डोळेझाक करत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
पारनेर शहरात शासकीय तहसिल कार्यालयाच्या गेटसमोर अनधिकृतरीत्या वाहन धारक चारचाकीदुचाकी वाहने सतत वेडी वाकडी लावत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करवा लागत आहे. तहसिल कार्यालयात पारनेर तालुक्यातून शासकिय विविध कामांनिमित्त नागरिक येत असतात परंतू, पारनेर तहसिलचे मेन गेट कायमचच बंद असल्याने शेजारीच असलेल्या छोट्या गेट मधून नागरिकांची ये-जा चालू असते. तहसिलचे मेन गेट बंद असल्याने चारचाकी वाहन धारक या जागेचा गाडी पार्किंगसाठी राजरोसपणे वापर करत असतात. या आडव्या तिडव्या लावलेल्या गाड्यांमुळे समोरिल रस्त्यावर कायमच चक्का जाम दिसुन येतो, त्यामुळे तहसिलच्या प्रशासकिय कामानिमित्त आलेल्यांना नागरिकांना या मुजोर वाहन धारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शेजारीच पोलिस स्टेशन असुन देखील पोलिस माञ बघ्यांची भुमिका घेताना दिसुन येत आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक करत आहेत.