Breaking News

घरकुलाची स्वप्नपूर्ती झाल्याने खरे समाधान -गडाख; आदिवाशी महिलेला सुनिता गडाख यांच्या हस्ते घरकुल प्रदान


नेवासे/प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माळेवाडी खालसा येथील अनाथ आदिवासी समाजातील महिलेला पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता गडाख यांच्या हस्ते घरकुल प्रदान करण्यात आले. अनाथ आदिवासी महिलेच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती झाल्याने खरे समाधान मिळाले असल्याचे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीच्या मार्गदर्शक सुनिता गडाख यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी गडाख यांच्या हस्ते अनाथ असलेल्या गीताबाई बर्डे या आदिवासी महिलेच्या हातात घरकुलाची चावी देण्यात आली.

यावेळी झालेल्या घरकुल प्रदान कार्यक्रमाप्रसंगी नेवासे पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित या अध्यक्षस्थानी होत्या. तर गटविकास अधिकारी शेखर शेलार, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, पंचायत समितीचे सदस्य कैलास झगरे, प्रवरासंगम ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सुनील बाकलीवाल, माजी सरपंच राहुल पाटील, प्रकाश पांडव, गणेश सुडके, महेश कोठारी, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे, अरुण माळी, मुरलीधर खेमनर, सागर म्हस्के, माधवराव शिंदे, पंचायत समितीचे अधिकारी बन्सीभाऊ आगळे, शिवाजी राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे घुले रावसाहेब यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. सरपंच सुनील बाकलीवाल यांनी प्रास्ताविक केले. ज्योती पाटील व आशा मोरे यांच्या हस्ते सुनिता गडाख व कल्पना पंडित यांचा गौरव करण्यात आला. तसेच अनाथ असलेल्या आदिवासी लाभार्थी गीताबाई बर्डे यांना साडीचोळी देऊन गडाख यांच्या हस्ते सन्मान करून गौरविण्यात आले.

सुनिता गडाख बोलतांना म्हणाल्या की, तळागाळातील उपेक्षित घटकांना घरकुल मिळाले पाहिजे. असा आपला निर्धार होता. तो गावपातळीवर लाभलेल्या योगदानातून अधिकार्‍यांनी तत्परतेने केलेल्या कार्यवाही मुळे सफल झाला आहे. उपेक्षित घटकांना घरकुले मिळतील त्यापासून कोणीही वंचित रहाणार नाही. त्यादृष्टीने अधिकारी काम करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्वाधिक घरकुले माळेवाडी गावात मंजूर झाले असल्याचे सांगून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्याचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात सभापती कल्पना पंडित यांनी अजून बरेच घरकुले मंजूर होणार असून राहिलेल्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी सोमनाथ साठे, मोहनराव शिंदे, ग्रामसेवक सुभाष शेळके, संतोष कासोदे, संतोष मोरे, अमित सावंत, अरुण पवार, राहूल धनवटे, ताराचंद बर्डे, रोहिदास माळी, तलाठी सुनील खंडागळे, शांतवन खंडागळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.