Breaking News

चुंबकीय उपचार व निसर्गोपचार शिबीरास प्रतिसाद


सातारा (प्रतिनिधी) : आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात मानवापुढे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. आरोग्यम धनसंपदा या वाक्याचा अर्थ काय हे, आजारी पडल्यानंतरच माणसाला कळते. आरोग्य चांगले असेल तर, सर्वकाही चांगले असते. जीवन आनंदी असते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चे आरोग्य सांभाळणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

कला व वाणिज्य महाविद्यालय येथे (कै.) अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा जिल्हा मराठा प्रसारक समाज, लायन्स क्लब सातारा अजिंक्य आणि दि रुरल हेल्थ सोसायटी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 40 दिवसांचे चुंबकीय उपचार व निसर्गोपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. 16 मार्चपर्यंत चालणार्‍या या शिबीरच्या शुभारंभ प्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, ला. बाळकृष्ण जाधव, निसर्गोपचार तज्ञ डॉ. हरिष ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, फास्ट फूडचा वापर, व्यायामचा अभाव, वायूप्रदूषण यामुळे दिवसेंदीवस व्याधींचे प्रमाण वाढत चालले आहे. निसर्गाचा र्‍हास होत असतानाच माणूस काँक्रीटच्या जंगलात राहू लागला आहे. अशालेळी अ‍ॅलोपॅथी, होमीओपॅथी आणि आयुर्वेदासह चुंबकीय व निसर्गोपचार योग्य तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास रुग्णांना निश्‍चित फायदा होतो. या शिबीरात मधुमेह, बीपी, दमा, संधीवात, मणक्याचा त्रास, डिप्रेशन, टेन्शन, झोप न लागणे, गुढगेदुखी अशा जुन्या व नवीन आजारांवर उपचार देण्यात येत असून याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी केले. चुंबकीय उपचार हा दुसर्‍या कोणत्याही उपचाासोबत चालू ठेवता येतो. या उपचार पध्दतीमध्ये कोणतेही रासायनिक औषध देण्यात येत नाही. त्यामुळे कोणताही अपाय होत नाही. चुंबकीय स्पर्श, चुंबकीय पाणीयावरुन उपचार करण्यात येतात. तेच योगा आणि प्राणायामाची माहिती, दैनंदीन जीवन, आहार-विहार, आध्यात्मिक बाबत सुध्दा मार्गर्शन करण्यात येते, असे डॉ. ढगे यांनी यावेळी सांगितले.