Breaking News

मुलाच्या वाढदिनी दिव्यांगांसह विद्यार्थ्यांना फळवाटप; धामणीतील दुर्योधन केंगार यांचा उपक्रम


नरवणे (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील धामणी येथील राहिवासी असणारे आणि दहिवडी येथे खाजगी नोकरीत कार्यरत असणारे दुर्योधन केंगार यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. आपल्या मुलाच्या वाढदिनी दिव्यांग मुलांच्या शाळेत फळवाटप करीत केंगार यांनी समाजसेवेचा वसा आणि वारसा जपला आहे.

दुर्योधन केंगार व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सुपूत्र श्रेयस याचा वाढदिवस एका आगळ्यावेगळ्या सामाजिक बांधिलकी जपणार्‍या उपक्रमातून साजरा केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंधळी पुनर्वसन शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असलेल्या श्री. केंगार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंधळी पुनर्वसन व अस्थिव्यंग मुलांची शाळा दहिवडी येथील मुलांना सफरचंद, केळी व इतर फळांचे वाटप करून साजरा केला. त्यातून त्यांनी उदात्त सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवले. याप्रसंगी यब तहसीलदार दीक्षित, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती गायकवाड आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.