Breaking News

खासदार गांधी यांच्या विसापूर येथील कार्यक्रमात गोंधळ


 विसापूर ता. श्रीगोंदे येथील कार्यक्रमात खा. दिलीप गांधींना काही ग्रामस्थांनी अर्वाच्य भाषा वापरल्याने काही काळ दोन्ही गटात तणाव झाला होता. पण काही वेळातच तणाव निवळला आणि विकासकामांचे भूमिपूजन खा. गांधी यांनी केले.

 या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खा दिलीप गांधी आपल्या समर्थक कार्येकर्ते यांच्यासह विसपूरचे सरपंच अरविंद जठार यांच्या विंनती वरून काल दि.26रोजी विसापूर आले होते. तेथील खासदार निधीतून दिलेल्या विकास कामांचा शुभारंभ करायचा असल्याने ते विसापूर येथे आले असता तेथील ग्रामस्थ यांनी रेल्वेच्या भुयारी बोगद्याची जागा का बदलली त्यामुळे ग्रामस्तानी खा. गांधींवर प्रश्‍नांची सरबत्ती केल्याने बराचवेळ तणाव निर्माण झाला होता.

 विसापूर येथे रेल्वेने भुयारी बोगद्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि विविध पत्रे घेऊन बोगद्यास रेल्वेने मान्यता दिली होती. ज्या ठिकाणी मान्यता मिळाली. ती रद्द करून येथील काहींनी खा. गांधी यांना हाताशी धरून त्यानां सोईस्कर ठिकाणी भुयारी बोगद्याला खा. गांधी यांनीच प्रयत्न केले. आणि त्याचे ठिकाण बदलले असा आरोप येथील ग्रामस्थांचा होता. त्या मुळे त्यांनी खा. गांधी कार्यक्रमाला येताच त्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला गेला असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.