Breaking News

शंकरराव जगताप आर्टस अँड कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथप्रदर्शन


पिंपोडे बुद्रुक(प्रतिनिधी) : वाघोली ता.कोरेगाव येथील शंकरराव जगताप आर्टस अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. वाचकप्रेमींना वाचन संस्कृती आणि अद्यावत वाचन साहित्याविषयी माहिती व्हावी याकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज गोंडे यांच्या मार्गदर्शना खाली, ग्रंथपाल प्रा.प्रवीण कुंभार यांनी विद्यार्थ्याना आणि पंचक्रोशीतील वाचक प्रेमी,पालक आणि ग्रामस्थ यांच्या करीता ग्रंथ प्रदर्शनाचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला.

या प्रदर्शनात मराठी विश्‍वकोश, इतिहास व भूगोल विषयाचे ज्ञानकोष, मराठी, हिंदी विषयाचे कथा संग्रह, कादंबर्‍या, काव्यसंग्रह आणि विपुल साहित्य उपलब्ध केले होते याला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रा.संजय साळुंखे, प्रा.बिपिन वैराट, प्रा.पाटील, ग्रंथालय सहाय्यक शिवाजी नावडकर, सुधीर काटकर,प्राध्यापक वर्ग व विध्यार्थी उपस्थित होते.