Breaking News

चिल्लर...खोटा पैसा...कण्डक्टर आणि भगिरथही

नितीन बानुगडे-पाटील साठी इमेज परिणाम

सातारा, (प्रतिनिधी) : येथे नुकत्याच झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या 15 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही नेत्यांनी या अधिवेशनात चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. तसेच अनेक किस्सेही सांगितले. ना. बानुगडे-पाटील यांच्या भाषणातील मुद्यांवर ना. रामराजेंनी चिमटे काढल्याने त्यांची चांगलीच जुगलबंदी रंगली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला होता.
नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या मनोगतात एस. टी. प्रवासामध्ये घडलेला एक किस्सा सांगितला. एकदा बानुगडे-पाटील हे एस. टीतून प्रवास करताना त्यांच्या शेजारी गृहस्थ बसले होते. एका स्थानकावर बस थांबल्यावर त्या गृहस्थांनी दोन वेळा खिशात हात घालून चिल्लर काढून मोजून खिशात टाकत होता. त्यानंतर बस निघण्याच्या वेळेत त्यांनी तेच चिल्लर देऊन वर्तमानपत्र खरेदी केला. यानंतर गाडी सुरू झाली त्यावेळी बानुगडे पाटील यांनी बस थांबल्यानंतर तुम्ही वर्तमानपत्र का खरेदी केले नाही असे विचारले. त्यावर त्या गृहस्थाने चिल्लरमध्ये एक रूपया खोटा असल्याचे सांगितले. त्यानंतर वर्तमानपत्र खरेदी केल्यानंतर पेपर वाचत असताना ते हसत होते. याबाबत त्यांना विचारणा केल्यानंतर त्या गृहस्थांनी अहो पेपर तर घेतला पण त्याने कालचाच पेपर दिला. या किश्श्यावर सभागृहात एकच टाळ्यांचा कडकाडाट झाला आणि हशा पिकला.
बानुगडे पाटलांचा हाच धागा ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात घेतला ना. बानुगडे-पाटील यांची भाषणं नेहमी मार्मीक व खुमासदार असतात. मात्र त्यांनी दिलेले उदाहरण कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहिल. एसटी ड्रायव्हर,कंडक्टर व त्यांच्या शेजारी बसलेला सदगृहस्थ,आणि हे सगळं ओळखणारा वर्तमान पत्रकार आहेत. याच्यात बसस्टेशन कुठे सापडलं, यात आमची नेमकी भूमिका काय? ड्रायव्हर आहे का? कंडक्टर आहे का? सदगृहस्थ आहे हे कशावरून ओळखायचं? असे प्रश्‍न उपस्थित करताच एकच हशा पिकला.
बानुगडेसाहेब तुम्ही फार सुखी आहात तुम्ही रोज एक लेक्चर देताय मी रोज एक लेक्चर ऐकतोय. मला मोबाईलचा बराच नाद आहे. याच मंचावर मला तुम्हाला एक सांगायचे आहे की टेड नावाचे एक अ‍ॅप आहे. यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही मिनिटात कळत असतात. आपल्याला बायकोने वाढलं नाही तरी चालेल मात्र जनतेनं मतं टाकलं नाही तर आत्महत्या करायची पाळी येईल. या आमच्या गरज आहेत. नको त्या भानगडीत पडलं की असंच असतं. आज जरी तुम्ही प्रोफेसर मी ही प्रोफेसर होतो आतापर्यंत रिटायर्ड व्हाईस चॉन्सलर होवून घरी बसलो असतो. या वयात कुठलेच धोके नाहीत मात्र धक्के बसले नसले तरी धोके आहेत. धक्के बसले तर पाठ दुखायला लागते असं सगळं आमचं हे आयुष्य असतं. जिल्ह्यातील मंडळींना धक्के कायमच बसतात यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
बानुगडे पाटलांच्या मुद्यावर बोलताना ना. रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले,भगिरथाने गंगा आणली ती कोयनेत गेली, कोयना कृष्णेत गेली. आपण पुढे सांगितले नाही की पुढे काय झालं, आमचं असं म्हणणं आहे की तुमची गंगा असुद्या यमुना असुद्या आपल्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे असे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात राजकीय शैलीतून नितीन बानुगडे पाटील यांना चिमटे काढले. दरम्यान, ना. रामराजे नाईक निंबाळकर यांचे भाषण सुरू असताना जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात एका कॅमेर्याच्या हॅलोजनला शॉर्टसर्कीट झाल्याने तडतड असा आवाज आला त्यावेळी ना. रामराजे यांनी आमच्या झेडपी हॉलला आग लागणे शक्य नाही कारण तो प्रामाणिकपणे बांधलेला हॉल आहे.