Breaking News

अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सव्वा लाखाचा एैवज लंपास


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सव्वा लाखाचा एैवज लंपास केल्याची घटना शनिवार दि.9 रोजी पहाटे घडली. दरोडेखोराच्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. या बाबत शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शेवगाव शहरात जैनगल्ली येथे राहणारे बाबा दामोदर नाईक यांची दादेगाव रोडवर शासकीय गोदामाजवळ शेती व जनावरांचा गोठा आहे. ते शनिवार दि.9 रोजी या गोठ्यात झोपण्यासाठी गेले असता पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने बाहेर आले. यावेळी तिन अज्ञात इसमांनी त्यांना घेरले व जान प्यारी है तो मुह बंद रख अशी हिंदीत धमकी देऊण त्यातील एकाने त्यांच्या पाठीला व डोक्याला लोखंडी टामीने मारहाण केली. या मारहाणीत नाईक जखमी झाल्यानंतर या चोरट्यांनी त्यांना गोठ्यात आणले.
तेथून नाईक यांनी ऊसाच्या पेमेंट देण्यासाठी बँकेतून काढलेले 1 लाख रुपये रोख व दोन सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल असा सव्वा लाखाचा ऐवज चोरुन चोरटे पसार झाले. त्यानंतर जखमी नाईक यांनी आरडाओरड केल्याने शेजारीच राहणारे त्यांच्या शेतातील कामगार विजय झगडे व त्यांचा मुलगा प्रविण झगडे घटनास्थळी आले. त्यांनी नाईक यांना उपचारार्थ शेवगाव येथील रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथोमपचार करुण त्यांना पुढील उपचारार्थ नगर येथे रुग्णालयात दाखल केले. याबाबत जखमी बाबा नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरुण शेवगाव पोलिसांनी तिन अज्ञात चोरट्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी श्‍वानपथकाला पाचारण केले असता पथकाने घटनास्थळापासून दादेगाव रस्त्याने दोन कि.मी. माग दाखविला आहे. पुढील तपास स.पो.नि. नितीन मगर हे करीत आहेत.
-