Breaking News

कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दुसर्‍या दिवशी सुरुच


कोयनानगर (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसर्‍या टप्प्यातील कोयनानगर येथील छ. शिवाजी क्रीडांगणावर सुरू झालेले ठिय्या आंदोलन दुसर्‍या दिवशी सुरुच राहिले.

आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी प्रकल्पग्रस्तांनी कोयनानगर येथील महसूल भवनावर आंदोलन स्थळापासून मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मंडलाधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत उपस्थित मंडलाधिकारी, तलाठी कर्मचारी यांच्या सोबत चर्चा झाली. आंदोलक प्रकल्पग्रस्तांशी झालेल्या चर्चेमध्ये दुरूस्त संकलन याद्या दुसर्‍या दिवशी दि. 14 फेब्रुवारी रोजी आंदोलनस्थळी देण्याचे मान्य केले. तसेच नवजा चौथा टप्पा ब चे संकलन वाचन आंदोलनस्थळीच येत्या दोन दिवसात वाचण्याचे मान्य केले. स्वतंत्र ग्रामपंचायतीबद्दल व चौदा गावातील व्यवहार बंदी विषयीची सर्व लिखित माहिती देण्याचे मान्य करून इतर विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी श्रमिक मुक्ती दल पाटण तालुका कमेटीचे अध्यक्ष संजय लाड, व सर्व कमेटी सदस्य, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

यावेळी सचिन कदम, दत्ता देशमुख, महेश शेलार, दाजी पाटील, डी.डी. कदम, श्रीपती माने, संजय कांबळे, कमल कदम, वासंती विचारे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.