Breaking News

मनोहरनाथ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा


नेवासाफाटा/प्रतिनिधी
नेवासा येथील मध्यमेश्‍वर मंदिराचे प्रमुख सिद्ध योगी महंत प.पू.मनोहरनाथ महाराजांचा बुधवारी दि.13 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी सोहळा आयोजित केला असून असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पीर योगी लक्ष्मणनाथ महाराज यांनी दिली.

महंत योगी मनोहरनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 8 ते 10 यावेळेत मूर्तीस महाभिषेक व मूर्तीपूजन, त्यानंतर सकाळी 9 ते 10 यावेळेत योगी मनोहरनाथ महाराज लिलामृत ग्रंथवाचन, सकाळी 10 ते 12 बहिरवाडी येथील हभप विजय महाराज पवार यांचे कीर्तन होणार आहे. पुण्यतिथीनिमित्ताने होणार्‍या धार्मिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महंत योगी लक्ष्मणनाथ महाराज,योगी अमृतनाथ योगी देवनाथ, योगी आकाशनाथ यांनी केले आहे.