Breaking News

पॉलिशच्या बहाण्याने सोने लंपासपुसेसावळी (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील जयराम स्वामीचे वडगाव येथील माजी सैनिक अशोक रामराव घार्गे यांच्या पत्नीकडून राहत्या घरातून सोने पालिश करून देण्याचं आमिष दाखवून साडेपाच तोळ्याचा सुवर्ण अलंकार लंपास केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारच्या वेळेत दोन अनोळखी इसम त्यांच्या घराजवळ आले त्यांनी आम्ही सोने चांदीचे पॉलिश करतो तुमचे करायचे असेल द्या, आम्ही बिना मोबदला पॉलिश करुन देतो. या अमिशाला बळी पडून अशोल घार्गे यांच्या पत्नीने आपल्या जवळील साडेपाच तोळयाचा सुवर्ण अलंकार दिला. आणि त्या इसमांनी तो त्यांना पॉलिश केला आहे असे सांगून त्या भांड्यातून अर्धा तास बाहेर काढू नका असे सांगितले. त्यानंतर ते इसम तेथून लंपास झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी औंध पोलिसला झालेली घटना सांगितली. त्याचप्रमाणे अनोळखी इसमावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक विलास कुबले करीत आहेत. दरम्यान, ओैंध पोलीस ठाणेअंतर्गत येणार्‍या गावामध्ये अनोळखी व्यक्ती दिसल्यास पोलीस स्टेशनची संपर्क साधावा तसेच अशा प्रकाराच्या घटना हातचलाकीने केल्या जातात तरी अशा व्यक्तिंना बळी पडु नये, असे आवाहन केले आहे.