Breaking News

बेटी बचाव मोबाईल व्हॅन हा स्तुत्य उपक्रम : ज्योत्स्ना कापडे


कोरेगाव (प्रतिनिधी): बेटी बचाव बेटी पढाव हे केवळ अभियान उरले नसून ही चळवळ झाली आहे आणि त्या अंतर्गत मोबाईल व्हॅनद्वारे होत असणारे जनप्रबोधन हे अत्यंत स्फूर्तीदायी बाब व स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन कोरेगाव तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योत्स्ना कापडे यांनी केले.

महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मोबाइल व्हॅनद्वारे सर्वत्र जनजागृती करण्यात येत असून त्याद्वारे बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश प्रभावीपणे गावागावात पोचवला जाणार आहे. या मोबाईल व्हॅनचे कोरेगाव पंचायत समितीत स्वागत करताना सौ. कापडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कोरेगाव तालुक्यात या मोबाईलचा वापर निश्‍चितच प्रभावीपणे होईल कोरेगावचे दोन्ही बालविकास प्रकल्प सक्षमपणे काम करीत असून आम्ही बेटी बचाव बेटी पढाव साठी सर्व त्या योजना मोबाईल व्हॅनद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करून या प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये सर्व संबंधित पर्यवेक्षिका अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका प्राणपणाने मदत करतील गटविकास अधिकारी शरद मगर तसेच सभापती श्री. जगदाळे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत आहे हा एक अभिनव आणि स्फूर्तीदायी उपक्रम असून त्यामुळे लोकांचे लक्ष मुलींचे शिक्षण आणि मुलींच्या जन्माचे स्वागत याकडे प्रभावीपणे वेधले जाईल, असे स्पष्ट करून त्यांनी मोबाईल संकल्पना सुरू केल्याबद्दल सर्व वरिष्ठ तसेच संबंधित यंत्रणेचे मनापासून अभिनंदन केले या उपक्रमाचा शुभारंभ कोरेगाव पंचायत समिती येथे झाला त्या वेळी सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या हस्ते तसेच पर्यवेक्षिका, अंगणवाडी मदतनीस, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. प्रतिभा वांगीकर, उपस्थित होत्या. सातारारोड, पिंपोडे बुद्रूक, वाठार किरोली, पळशी अंगणवाडी क्षेत्रासह तालुक्यात ठिकठिकाणी या लेक वाचवा दूत मोबाईल व्हॅनचे उत्सफूर्त स्वागत केले.