Breaking News

मागासवर्गीय वस्ती सुधार योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेस प्रारंभपारनेर/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील मौजे खडकवाडी ता. पारनेर येथे मागासवर्गीय वस्ती सुधार योजना तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजना या विविध विकास कामांचे भुमिपूजन जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत साठ हजार लिटर पाण्याची टाकी अंदाजे रक्कम 9 लक्ष निधी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत मागासवर्गीय वस्ती सुधार योजना, दलित वस्ती विकास करणे चर्मकार वस्ती पाणी पुरवठा निधी रु. 8 लक्ष, जिल्हा परिषद सेस अंतर्गत गागरेवस्ती, पानंदरस्ता मुरमीकरण निधी रु. 3 लक्ष, तसेच 14 व्या वित्त आयोगाच्या रोकडे वस्ती येथील प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत असा एकूण 23 लक्ष रुपयांचे कामाचे भुमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दाते बोलत होते की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खडकवाडीचा विकासाचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. तसेच जांभळवाडी या आदिवासी वस्तीचा पाणी पुरवठा योजनेही मार्गी लावणार असून लवकरच त्याचे काम सुरू होईल. गावाचा विकास करण्यासाठी रस्त्याची जाळी असणे गरजेचे असते त्यामुळे माझ्या जिल्हा परिषदेच्या गटातील सर्व गावातील मुख्य रस्ते वाड्या वस्ती रस्ते ना. विजयराव औटी यांच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न राहील तसेच दुष्काळी परिस्थितीमूळे गावातील मजूरांना रोजगार हमी योजनेंतर्गत हाताला काम देण्याचा प्रयत्न करण्याचा मानस जि. प. सदस्य दाते यांनी व्यक्त केले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव रोकडे, सरपंच ज्ञानदेव माऊली गागरे, कोंडीभाऊ गागरे, शिवसेना विभाग प्रमुख अमोल रोकडे, डॉ. सुदाम आहेर, एम. एन. ढोकळे, विठ्ठल शिंदे, प्रताप रोकडे, धनंजय चौधरी, धनंजय ढोकळे, अविनाश ढोकळे, डॉ. दळवी, ज्ञानदेव रोकडे, विकास रोकडे, बाबासाहेब सागर, बबन रोकडे, भागचंद हुलावळे, शिवाजी रोकडे, संपत हुलावळे, अशोक गागरे, बाबासाहेब नवले, अण्णा घेमुड, बबन गागरे आदी मान्यवर उपस्थित होते.