Breaking News

नगरसेवक नज्जू पैलवान यांचा नागरी सत्कार


अहमदनगर / प्रतिनिधी : “हाजी नज्जू पैलवान हे नगरमध्ये सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा हा लोकप्रतिनिधी सेवक या भावनेने कार्य करीत असून, त्यांनी नागरिकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत,’’ असे प्रतिपादन अच्युतराव हंगे यांनी केले. नगरपालिका ते महापालिकेत सलग नऊव्यांदा नगरसेवकपदी निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक हाजी नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांचा चाँद सुलताना हायस्कुलमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अच्युतराव हंगे उपस्थित होते.