Breaking News

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसाठी सातारा जिल्हा ठरली कार्यशाळा


सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्हात कार्यरत राहून कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांची पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस दलात बदली होऊ लागल्याने सातारा जिल्हा पोलिस अधिकार्‍यांसाठी सातारा जिल्हा कार्यशाळा ठरू लागली आहे.

नुकतीच सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे उपायुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी तेजस्वी सातपुते या ढायशिंग महिला अधिकारी यांची बदली झाली आहे. यापूर्वीचे जाबाज सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कडे पुणे ग्रामीण पदभार देण्यात आला. सध्या सातारा जिल्हात काम करणारे पोलीस अधिकारी श्रीधर जाधव, राजेंद्र मोकाशी, पद्माकर घनवट, बी. आर. पाटील, नारायण सारंगकर, राजेंद्र मुळीक, शैलजा जानकर अशा अनेक अधिकार्‍यांनी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे. सातार्‍यातील अनेक उधोजक, विद्यार्थी व लघु उधोजकानी तसेच विविध क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यानी सातारा जिल्ह्यापेक्षा पुणे जिल्हात जाऊन आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. 

सध्या डझनभर राजकीय नेते हे पुण्यात राहून सातारा जिल्हाच्या विकास कामांबाबत प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा ही एक प्रकारे कार्यशाळा असल्याची खात्री पटली आहे.सातारा जिल्हात काम करून पुणे येथे महसूल विभागात  आपला ठसा उमटविणारे विकास देशमुख, रामदास जगताप,सोनापा यमगर, शंकरराव जाधव असे अनेक अधिकारी यांनी सातारा जिल्हाचा अनुभव घेऊन कामकाज पाहिले आहे.