Breaking News

शेरे येथे तीन एकर ऊस जळाला


कार्वे (प्रतिनिधी) : शेरे (ता. कराड) येथील थोरात मळा नावाच्या शिवारामध्ये रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे शेतकर्‍यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. येथील थोरात मळा नावाची शिवारात वीजवाहक तारा लोंबकळत असून या ठिकाणी वारंवार शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी सायंकाळी माणिक शंकर निकम यांच्या शेतात सुरुवातीला शॉर्टसर्किट झाल्याने ऊसाला आग लागली . त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूला असलेल्या परिसरातील तीन शेतकर्‍यांच्या शेतातील तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अरुण जयसिंग थोरात, संपत अण्णा उतळे व माणिक शंकर निकम या शेतकर्‍यांचा ऊस जळून नुकसान झाले, ही आग विजवण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न केले. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलानेही आग विझवण्यासाठी तात्काळ धाव घेतल्यामुळे सात एकर ते आठ एकर ऊस आगीपासून वाचवला.