Breaking News

ऑनलाईनच्या जमान्यात करिअरसाठी सैराट व्हा-आ.धस कॉलेज जीवनातच भविष्याचं नियोजन करा-आयुक्त किरणकुमार गित्ते

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- सैराट चित्रपटाचा संबंध प्रेमाशी जोडुन नविन पिढी वाया गेली असं लोक म्हणत असले तरी याच नविन पिढीनं उरी चित्रपट डोक्यावर घेवुन आपली देशभक्ती दाखवली.स्पर्धेच्या युगात नविन पिढीला अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध आहे.ऑनलाईनच्या जमान्यात आपलं करिअर चांगलं करून समाज आणि देशभक्तीसाठी सैराट व्हा असं सांगुन विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री आ.सुरेश धस यांनी खोलेश्वर महाविद्यालयास संगणकांसाठी १० लक्ष रूपये देण्याची घोषणा केली.दरम्यान मुला-मुलींनी शिक्षण घेत असताना आपल्या जीवनाचं प्लॅनिंग करून चांगलं भविष्य घडवण्यासाठी कठोर मेहनत करताना चिकाटी व जिद्द ठेवुन पुढे आले पाहिजे. मोबाईलचा अतिरेक न करता माणसामाणसांत मिसळुन संवादपुर्ण जीवन जगुन मिळणारा आनंद अभ्यास करण्यासाठी पोषक असतो.आई-वडिलांचे स्वप्न आणि आपल्या परिस्थितीची जाण ओळखुन अभ्यासाला महत्व दिलेच पाहिजे असे प्रतिपादन पुण्याचे पीएमआरडीए आयुक्त किरणकुमार गित्ते यांनी केले. येथील खोलेश्वर महाविद्यालयात स्नेह संमेलन कार्यक्रमात समारोपप्रसंगी ही मंडळी बोलत होती. अध्यक्षस्थानी भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर हे होते.उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे अध्यक्ष राम कुलकर्णी यांनी संस्थेच्या महाविद्यालयाची ओळख करून देताना आ.सुरेश धस यांच्या कडे संगणकांसाठी दहा लाख रूपये देण्याची मागणी केली.या कार्यक्रमात किरणकुमार गित्ते यांनी मुला-मुलींना अतिशय परखड शब्दांत मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्याला काय व्हायचं आहे?हे अगोदर निश्चित करा. डोळ्यांसमोर भविष्य आणुन परिस्थितीची जाणिव ठेवा.प्रत्येकाचं आयुष्य खडतर आणि कठोर असतं. मात्र महाविद्यालयीन शिक्षण हे आपल्या जीवनाचं भविष्य घडवणारा काळ आहे.त्याचं नियोजन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आधुनिकीकरणाच्या जमान्यात मोबाईल साधन सामुग्रीमुळे सतत ऑनलाईन आणि त्याचे होणारे परिणाम हे आता व्यसन बनले असुन त्यापेक्षा माणसामाणसांत मिसळा आणि प्रत्येकाशी संवादपुर्ण जीवन जगताना माणसाला टाळु नका हा सल्ला त्यांनी दिला