Breaking News

लोणी येथे भरती मेळाळा


प्रवरानगर/प्रतिनिधी: लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील अंतिम वर्षातील आणि पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि.1 मार्च 2019 रोजी औरंगाबाद येथिल धूत ट्रान्समिशन प्राव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीच्यावतीने भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे यांनी दिली.

ग्रामीण भागातील मुला-मुलींना पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लागेचचं नोकर्‍या उपलब्ध होण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातत्याने देश विदेशातील नामांकित कंपन्यांना मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात येते. अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पदवीची परीक्षा देण्यापूर्वीच अनेक कंपन्यांनी मुलाखती घेऊन नेमणुकीचे पत्र दिले आहे. ग्रामीण भागातील मुले हुशार असूनही केवळ मुलाखतीमध्ये व्यक्त होऊ शकत नाहीत. म्हणूनच असी मुले-मुली नोकरीच्या संधी पासून दूर राहू नये, यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध महाविद्यालयांमधून शिक्षणाबरोबरच त्या त्या विषयातील कौशल्याचे प्रशिक्षण देऊन औद्योगिक कंपन्यांना अपेक्षित असलेले मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी, कंपन्यांना पाहिजे असलेले कौशल्य या मूला-मुलींमध्ये निर्माण केले जाते.

आजपर्यंत अनेकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकर्‍याप्राप्त झाल्या असल्याचे ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर यांनी सांगितले. शुक्रवार दि.1 मार्च 2019 रोजी औरंगाबाद येथिल धूत ट्रान्समिशन प्राव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीच्या वतीने लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्यामुलाखतीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेमधील विद्यार्थ्यांनी तसेच या शाखांमधून पदवी घेतलेल्या मुलं-मुलींनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्लेसमेंट विभागाचे प्रा. आप्पासाहेब शेळके यांनी केले आहे.