Breaking News

कवितांचं गाव जकातवाडीस महाराष्ट्र साहित्य परिषेदेचे सहकार्य : विनोद कुलकर्णी


सातारा / प्रतिनिधी : साहित्य संस्कृती वाढविण्यासाठी साहित्य आणि कवींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे ते काम जकातवाडीतील विद्यावर्धिनी वाचनालय आणि गावक-यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कवितेच्या गावासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी केले.

जकातवाडी हे देशातील पहिले कवितांचे गाव होत आहे. त्या अनुषंगाने येथील विद्यावर्धिनी वाचनालयामध्ये कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. उमेश करंबळेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे,सरपंच चंद्रकांत सणस, हणमंत भोसले वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद पार्टे, उपाध्यक्ष रत्नाकर शिळमकर,रामचंद्र लोंढे,योगेश महाडीक, सखुबाई देशमुख आयडियल टीचर्सचे अध्यक्ष प्रकाश बडदरे,मदन जांभळे,कवयित्री कांता भोसले,किशोर धरपडे,तुकाराम शिळमकर उपस्थित होते .

कवितेचं गाव ही खूप नाविण्यपूर्ण संकल्पना आहे, असे विनोद कुलकर्णी म्हणाले. सातारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे म्हणाले, विद्यावर्धिनी वाचनालय इतर ग्रंथालयांसाठी प्रेरणादायी आहे. गावाच्या भावी संकल्पना या विचारातून साकार होणार आहेत. हे कवितांचं गाव देशातील पहिले कवितांचं गाव आहे त्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील.

गावातील प्रत्येक घरांना कवितांच्या पुस्तकांची नावे द्यावीत , असे डॉ उमेश करंबेळकर यांनी सुचवले. कविसंमेलनात दादा सावंत यांची छंद,गायनाचा प्रथम,संगिता गुरव घरीदारी एक झाड लावायचं द्वितीय,आकाश पाटोळे यांची ग्रामविकास तृतीय यांच्या कवितांची निवड करणेत आली. त्यांना गौरवचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करणेत आला. या कविसंमेलनात सुरेखा पाटणे यांची कर संहार माते,यशवंत गायकवाड यांची आई जिंकणारच, हेमा जाधव यांची वीर जवाना, शशिकांत पार्टे यांची आम्ही म्हातारे ,अंजली गोळे याची बाप,सुरेखा कुलकर्णी यांनी सेल्फीप्रेमींना संदेश,रेश्मा चिखले यांची तांडव,श्रेया कदम मुलगी,सारंग गुजर यांची साता?्‌याची शान कवितेतून भिलार पुस्तकांच गाव अन जकातवाडी कवितांचं गाव सातार्‍याची शान ,मनिषा शिरटावले यांची माझी मराठी,जनार्दन लेंभे यांची वृक्षारोपणाविषयी असणारे कर्तव्य,अजय गुरव यांची लेक माझी ,आर.डी पाटील गात जावं कवितेला,इत्यादी कवींना कवितेच्या गावात प्रतिसाद मिळाला सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले