Breaking News

सुरेगावच्या पोलिस पाटलाला वाळू सम्राटांकडून माराहाण


कोपरगाव ता/प्रतिनिधी
तालुक्यातील सुरेगाव येथील वाळू सम्राटाने पोलिस पाटलाने वाळू उचलू दिली नाही. या कारणाने काल धक्काबुक्की करुन पोलिस पाटलाला व त्यांना सोडवण्यास गेलेल्या मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. व हाताला चावा घेतल्याची घटना घडली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
या संदर्भातील अधिक माहीती महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे संजय कृष्णराव वाबळे यांनी सांगितले की, सध्या महसुल गोळा करण्याचे व दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने काम चालू आहे.म्हणून शनिवारी दि.16 मार्च रोजी दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यान तलाठी गणेश गरकल व मी असे सुरेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात उतरलो. तर त्या ठिकाणी सचिन पांडू वाबळे वाळू उपसा करीत असल्याचे दिसले. त्यास आम्ही प्रतिबंध केला वर्षभरात 70 ते 80 ट्रॅक्टर वाळूचा उपसा सदर इसम करत असल्याची माहिती पोलिस पाटील वाबळे यांनी दिली. पोलिस पाटील वाबळे यांना तू आम्हाला वाळूचा उपसा करु देत नाही. काय तुझा बेतच पाहातो असे म्हणून त्यांचे अंगावर धावून आला. त्यांना धक्काबुक्की केली व हातात असलेल्या दांडक्याने छातीवर व पायावर मारहाण केली. मुलगा प्रितम संजय वाबळे हा मध्ये पडला असता त्याच्या हाताच्या अंगठयाला आरोपी सचिन वाबळे याने कडकडून चावा घेतला. व त्यांना जखमी केले. कामगार तलाठी गणेश गरकल यांच्याशीही झालेल्या झटापटीत त्यांचा चष्मा फुटला. पोलीस पाटील संजय वाबळे व प्रितम वाबळे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत वरील आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.