Breaking News

संधीला दिशा दिल्यास ध्येय सोपे :अँड. काकडे


शेवगाव/प्रतिनिधी: प्रत्येक विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्वतःला भविष्यात काय करायच आहे याची खूणगाठ मनाशी बांधुन वाटचाल केली तर निश्चित यश मिळेल. संस्था चालकाबरोबर शिक्षक व समाजातील प्रत्येक घटकांनी गावची शाळा एक चांगलेमॉडेल बनविण्याची नैतिक जबाबदारी उचलली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या संधीला योग्य दिशा दिली तर संधीचे सोने करता येते,ध्येय साधता येते असे प्रतिपादन एफ. डी. एल .शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. शिवाजीराव काकडे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक संभाजी लबडे व सर्जेराव फटांगडे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवनाथ देवढे,प्राचार्य चंद्रकांत आहेर, विजय पोटफोडे, सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख, बाबासाहेब घुले, हरीभाऊ फटागडे, भरत वांढेकर,सुनिल काकडे,बाबासाहेब कराड, शरदकुमार फसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.