Breaking News

रवंडी कासार येथे सरफाकडून गोरगरीबांची लुट


खरवंडी कासार/प्रतिनिधी: खरवंडी कासार येथील सराफांनी गोरगरीबांची लुट चालवली असून माध्यमातून अशुद्ध सोने असलेले मोठे रॅकेट असल्याच्या तक्रारी येत आहेत. खरवंडी कासार येथे बनवलेल्या सोन्याच्या वस्तू बाहेरील सराफ बाजारात कुठेही विकल्या जात नाहीत. यामुळे खरवंडी येथील सराफ बनावट पद्धतीचे व अशुद्ध बावीस कॅरेटचे सोने विकून गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी व ऊसतोड मजुर वर्गाची मोठी फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. 
 
या बनावट सोने विक्रेत्या सराफावर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.गळ्यातील मंगळसुत्र, नेकलेस, अंगठी, ताईत, साकळी, ब्रेसलेट आदी सोन्यांच्या वस्तुमधे बनावट पद्धतीचे बावीस कॅरेटचे सोने वापरुन आर्थीक लुट करत आहेत. यासाठी अशिक्षीत लोकांना गंडा घातला जात आहे. अज्ञानी लोकांना आयसआय व्होलमार्क असलेल्या सोन्याची पडताळणी करणे अवघड असल्याने सराफ दुकानदार याचा गैरफायदा घेत आहेत. यामुळे खरवंडी कासार येथील सराफ सोने खरेदी विक्रीत मोठी तस्करी करत आहेत. याचा पर्दाफाश काही सामाजिक कार्यकर्ते यांनी केला असून त्याचे पुरावे लवकरच भेसळ प्रतिबंधक कायदा अधिकारी यांकडे सुपूर्द करणार असल्याची खात्रीलायक माहीती दिली आहे. जर यांच्यावर केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. तर या सराफावर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.