Breaking News

आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी तपासणी


अहमदनगर/प्रतिनिधी : येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आनंदऋषीजी म.सा. यांच्या 27 व्या पुण्यस्मृती निमित्त स्व.पन्नालालजी हिरालाल बोरा स्मरणार्थ आयोजित होमिओपॅथी तपासणी शिबिराचे उद्घाटन इंटरनॅशनल इलेक्ट्रिकचे बोरा परिवार व बडीसाजन ओसवाल श्रीसंघ पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोरा परिवारातील राजेंद्र, विनोद, मिलाप, मयुर, निखील, महावीर, सिद्धांत, शुभम, कंवरबाई, सरलाबाई, प्रमिला, कल्पना, मेघा, लक्ष्मी, मयुरी, पल्लवी, सतीश डुंगरवाल, ‘बडीसाजन’चे अध्यक्ष विलास लोढा, राजेंद्र बोथरा, दीपक बोथरा, अजित कर्नावट, अनिल लुंकड, रतिलाल कटारिया, दिनेश शिंगवी, सूर्यकांत धोका, मिलिंद जांगडा, मिलापचंद पटवा, शशिकांत भंडारी, डॉ.शैलेश संचेती उपस्थित होते.

प्रास्तविकात संतोष बोथरा म्हणाले, “जनतेच्या सेवेसाठी दरवर्षी मार्च व ऑगस्टमध्ये शिबिराचे आयोजन केले जाते, त्याचबरोबर ग्रामीण भागात शिबिरे घेऊन तेथील रुग्णांना वर्षभर सेवा दिली जाते. आनंदऋषी हॉस्पिटलच्या नवीन दोन मजली दालनामुळे आता 200 बेडचे हॉस्पिटल पूर्ण झाले असून आता अधिक सेवा दिली जाईल.’’

डॉ. शैलेश संचेती यांनी होमिओपॅथी उपचारविषयी माहिती दिली. सूर्यकांत लोढा यांनी बडीसाजन ओसवाल संघाविषयी माहिती दिली व आनंदऋषी हॉस्पिटलच्या कार्यात सर्व पदाधिकारी कायम बरोबर असतील अशी ग्वाही दिली. यावेळी शिबिरात 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी कुंदन कांकरिया,आशिष भंडारी, सतीश लोढा उपस्थित होते.आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.