Breaking News

छत्तीसगडमध्ये चकमकीत चार नक्षलवादी ठार


सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा येथील बिमापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 4 नखलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला मंगळवारी सकाळी यश आले. या नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच नक्षलवाद्यांचे चारही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या भागात गोळीबार थांबला असला तरीही जवानांचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. सकाळी कोबरा 210 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत होते.

 या दरम्यान काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला जवानांनी ही प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. या नक्षलवाद्यांकडे 1 रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल मिळाले. सध्या या भागात गोळीबार थांबला आहे. परंतु, जवानांचे सर्च ऑपरेशन अजूनही जारी आहे. बिमापूरमपासून 1 किलोमीटर अंतरावर ही चकमक घडली आहे.