Breaking News

ज्ञानदीप इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा


नेवासे/प्रतिनिधी: नेवासे येथील श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाजवळ असलेल्या ज्ञानदीप इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञान प्रदर्शन भरवून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील बालवैज्ञानिकांनी रेन हार्वेस्टिंग, हवेच्या दाबावर चालणारी उपकरणे सादर करून सर्वांना आकर्षित केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण, माजी आ. शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव, शाळेचे समन्वयक प्रा.किशोर धनवटे, प्राचार्य दिलीप परदेशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी शाळेतील विद्यार्थी सुजल राजपूत, भूषण शेटे, उजेफ पठाण,समर्थ गवळी, रोहन जामदार, अभिजित जामदार, कृष्णा ससे, प्रसाद गायकवाड, गौरी कु-हे, सायमा शेख, अक्षदा कुंजळे, ईशान ललित, मनोज आढागळे, प्रणाली शेंडगे, अलिबा शेख, गायत्री तनपुरे, श्रावणी मापारी, धनंजय अंधारे यांनी आपल्या भाषणातून विज्ञान दिनाचे महत्व विषद केले.

यावेळी ज्ञानदीप इंग्लिश मेडियम स्कूलचे शिक्षक सतीश डिके, विज्ञान शिक्षिका निलोफर पठाण, किशोर दरंदले, देवदत्त दरंदले, दिलीप सरोदे, प्रतिभा शिंदे, शहेनाज देशमुख, कृष्णा कुलकर्णी, कांचन राजळे, मेघा शिंदे उपस्थित होते.