Breaking News

टिळकनगर-रांजणखोल रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी


टिळकनगर/प्रतिनिधी : टिळकनगर-रांजणखोल रस्त्यावर तातडीने गतीरोधक बसवावेत अशी जोरदार मागणी टिळकनगर येथील ग्रामस्थांनी केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी टिळकनगर रांजणखोल ह्या हमरस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतू ह्या रस्तावर कोणत्याही ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आलेले नाही.

वाहनांच्या वेगाना आवर घालण्यासाठी गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे. आठ दिवसापूर्वी टिळकनगर येथील जामा मस्जिद येथे अतिवेगात असलेल्या दुचाकीने चिमुरड्याच्या पायावरून गाडी घातली होती. सुदैवाने चिमुरड्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या अलीकडच्या भागांत कोंबळगल्ली असून, मोठी लोकवस्ती आहे, या गल्लीतून ठिकठिकाणी छोट्ये रस्ते असल्याने यातून लहान बालके सुसाट निघत असल्याने पलीकडच्या रस्त्यावरून होणार्‍या सुसाट वाहतुकीने मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच हा रस्ता मोठ्या वर्दळीचा असून, रस्त्यालगद शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. रस्त्यावरून शाळा बसेस सह नेहमी छोट्या मोठ्या गाड्यांची अतिवेगात सर्रास वाहतूक होत असते. म्हणूनच वाहनांची गती कमी करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्‍नाकडे बारकाईने लक्ष घालून तातडीने गतिरोधक व्हावे. अशी आशा ग्रामस्थ करीत आहे.

डांबरीकरण होण्यापूर्वी या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक अस्तित्वात असल्याने होणार्‍या भरधाव वाहतुकीला लगाम लागत असे. परंतु आता या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने अपघाताला एकप्रकारे निमंत्रणचा भेटत आहे.