Breaking News

म्हशीचे दूध महागणार


मुंबई / प्रतिनिधीः म्हशीच्या दूधाच्या दरात येत्या 1 एप्रिलपासून प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. ही वाढ केवळ सुट्या दूधावर होणार असून अमूल, गोकूळ, गोवर्धन यांसारख्या पाकिटबंद दूधाचे दर मात्र कायम राहाणार आहेत.

मुंबई मिल्क असोसिएशन अंतर्गत मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1,700 डेरींचा समावेश आहे. वाढीव दरानुसार येत्या गुरुवारपासून म्हशीच्या दुधाचा होलसेल दर 64 रुपये प्रतिलीटरहून 66 रुपये प्रतिलीटर इतका होईल, तर किरकोळ बाजारात म्हशीच्या दुधासाठी ग्राहकांना 70 ते 75 रुपये मोजावे लागतील. चार्‍याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याशिवाय, कामकारांचे वेतन आणि वाहतूक खर्च वाढत असल्याने दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 1 एप्रिलपासून म्हशीच्या दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ होईल आणि ही वाढ 30 सप्टेंबरपर्यंत कायम असेल.