Breaking News

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने खेळाडूंना मार्गदर्शन


अहमदनगर / प्रतिनिधी : “ जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने यशस्वी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत, नूतन क्रीडा अधिकारी कविता नवांदे यांनी क्रीडा कार्यालयाच्या वतीने खेळाडूंसाठी विविध उपक्रम राबवावे’’, असे प्रतिपादन प्रा.सुनील जाधव यांनी केले.
नूतन जिल्हा क्रीडाअधिकारी कविता नवांदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा क्रीडा संघटनांच्या वतीने प्रा.रंगनाथ डागवाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रा.सुनील जाधव, क्रीडा मार्गदर्शन ज्ञानेश्‍वर खुरांगे, राजेंद्र निंबाळकर, दिनेश भालेराव, सचिन काळे आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना क्रीडाअधिकारी नवांदे म्हणाल्या,“वाडिया पार्क क्रीडासंकुलातील विविध विभागांचा आढावा घेऊन खेळाडूंसाठी आणखी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस असून पुढील काळात जिल्ह्यातील खेळाडूंच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतील, संघटनांनीही त्यात आपला सक्रीय सहभाग द्यावा’’, असे आवाहन केले. सूत्रसंचालन राजेंद्र निंबाळकर यांनी केले तर दिनेश भालेराव यांनीआभार मानले.