Breaking News

मालेवाडी येथे विविध रस्त्याचे कॉक्रीटीकरण


खरवंडी कासार/प्रतिनिधी : ग्रामविकास खात्यातील पंचवीस पंधरा हेड अंतर्गत विविध रस्ते कॉक्रीटीकरण विकासकामे सुरु झाल्याची माहिती सुनिल खेडकर यांनी दिली.

पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील आ.मोनिका राजळे यांना पाठपुरावा करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याअंतर्गत पंचवीस पंधरा हेड अंतर्गत ग्रामपंचायत रस्ते कॉक्रीटीकरण विकासकामासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर केला असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे मालेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे रस्ते चकाचक होणार असून ग्रामस्थांना याचा लाभ होणार आहे. सरकार जनतेच्या विकासाचे काम करत असल्याचा आनंद आहे. असे प्रतिपादन सुनिल खेडकर यांनी केले. या विकासकामाच्या पाठपुराव्यासाठी पंचायत समिती सदस्य किरण खेडकर, सरपंच चंद्कला, पांडुरंग खेडकर, उपसरपंच शहादेव किर्तने ग्रामपंचायत सदस्ययांनी प्रयत्न केले.