Breaking News

’नुतन’ मध्ये फौजदारपदी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार


कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने फौजदारपदी निवड झालेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.आदिनाथ चेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

फौजदारपदी निवड झालेले माजी विद्यार्थी गोरख सातपुते, विजय कोठावळे, राहुल कोकाटे व अमोल कवळे यांचा विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. जीवनात कोणतेही ध्येय साध्य करताना जिद्द व चिकाटी गरजेची असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात केली तरच यशापर्यत पोहचता येत असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉ.नवनाथ टकले, डॉ. विलास कवळे यांची भाषणे झाली.
डॉ.चेडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, या विद्यालयातील मुले प्रशासकीय सेवेत दाखल झालेले पाहून, आयुष्यात जे उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांचे सार्थक झाल्याचे समाधान मिळत आहे.
यावेळी संस्थेच्या सहसचिव अंजली चेडे, उपप्राचार्य रघुनाथ शिंगाडे, पर्यवेक्षक जयंत चेडे, प्रा.बाबासाहेब पवार, दत्तात्रय श्रीमंदीलकर, परशुराम दळवी, ओंकार महाजन, शिवाजी नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.