Breaking News

मतदार नोंदणीची उद्यापासून मोहिम


सातारा, (प्रतिनिधी): येत्या लोकसभा निवडणूकीत कुणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी अद्यापपर्यंत ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अनुषंगाने दि.2 व 3 मार्च 2019 या कालावधीत विशेष मोहिमेंतर्गत मतदार नोंदणी पासून वंचित आहेत, अशांची नोंदणी करण्यात येणार आहे,

 ज्या नागरिकांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदणी केलेली नाही व ज्या मतदाराचे वय दि. 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पुर्ण झालेले आहे.अशा वंचित नागरिकांनाही मतदार यादीत नाव नोंदणी करावी. या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर,मतदानकेंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (इङज) हे उपस्थित राहुन नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्विकारणार आहेत.

 या कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने शनिवार व रविवार या सुट्‌ट्यांच्या दिवशी मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल यांनी दिली आहे.मतदार पडताणळी आणि माहिती कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम 2 व 3 मार्च 2019 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.