Breaking News

स्वाभिमानी नाभिक संघटनेचा उद्या वडूज येथे जाहीर मेळावा


मायणी/ प्रतिनिधी : राज्य नाभिक संघटनेतर्फे खटाव तालुका नाभिक समाजाचा परिवर्तन मेळावा, तालुका कार्यकारिणी निवड, नूतन पदाधिकारी व तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभ सोमवार दि. 11 रोजी सकाळी 11 वांजता वडूज येथील काळेश्र्वरी मंगल कार्यालयात आयोजित केला असल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण दळवी यांनी दिली.

या मेळाव्याचे उद्घाटन राज्य नाभिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गायकवाड व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण व राज्य आणि जिल्हा व तालुका संघटनांचे पदाधिकारीत्याचप्रमाणे वडूजचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के उपस्थित राहणार आहेत. नाभिक समाजातील युवा दिग्दर्शक मयुर महेश सरकाळे ( म्हासुर्णे ) टीव्ही सिरीयल प्रशांत भांदिर्गे, (निमसोड ) यांचा व राज्य आणि जिल्हा कार्यकारणीतील नूतन सदस्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

या समारंभास स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण सुरमुख, प्रकाश सुरमुख,राज्य सरचिटणीस मंगेश काशिद, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष गणेश पवार व खटाव माण तालुक्यातील नाभिक संघटनेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यास खटाव व माण तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.