Breaking News

नूतन होमगार्ड जवानांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिर


सातारा/ प्रतिनिधी : सातारा जिल्हा होमगार्ड संघटनेमध्ये नवीन सदस्य नोंदणी झालेल्या उमेदवारांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबीर धीरज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्डस सातारा यांनी सातारा पोलीस कवायत मैदान येथे दि. 16 ते 22 मार्च अखेर आयोजित केले होते. 

या शिबीरमध्ये प्रशिक्षणार्थीना पदकवायत, शस्त्र कवायत, विमोचन, प्रथमोचार, अग्निशमन तसेच अश्रुधुरांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच आचासंहितेच्या आदर्श नियमवाली बाबत शिबिरातील प्रशिक्षणार्थीना तसेच सातारा जिल्ह्यातील पटावर कार्यरत असणार्‍या सर्व होमगार्डना आपाआपले पोलीस स्टेशन मार्फत तेथील अधिकारी वर्गाने अत्यंत काळजीपुर्वक व सखोल मार्गदर्शन करुन सर्व होमगार्डना लोकसभा निवडणूक -2019 करीता प्रशिक्षण देऊन सुसज्ज केले आहे. या प्रशिक्षण शिबिरातील होमगार्डनी उत्कृष्ट संचलन करुन धीरज पाटील, पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगाईस सातारा यांना मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हा समादेशक यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांचेशी समक्ष संवाद साधून होमगार्ड संघटना तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत सखोल मार्गदर्शन केले.