Breaking News

सर्वसामान्यांचे साहेब !! डॉ. पतंगराव कदम साहेब


कडेगांव: साहेब आपण आमच्यापासून दूर गेलात एक वर्ष कसे उलटून गेले हे समजले नाही. आज तुम्ही असता, तर कॉंग्रेस पक्षाची आजची दयनीय अवस्था झालीच नसती. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षातील अतर्ंगत घुसमट, घराणेशाहीचे वर्चस्वाची स्पर्धा झाली नसती, कुरघोड्याचे राजकारण आपण अलगतपणे योग्य मार्गाने सोडवून पक्षाची आब राखली असती. 
 
साहेब आपण खरोखर ग्रेटच आहात. प्रत्येक कार्यकर्ताची क्षमता व व्यात्पी लक्षात घेवून त्यांची शक्तीस्थाने बळकट केलीत, सांगली जिल्हात व राज्यात कॉंग्रेस पक्षाला उभारी दिली होती. यावर मात करण्याचे धोरण आपणाकडे कधीच नव्हते, याउलट पक्षीय निष्ठा हा प्रमुख निकष आपण मानला होता. पक्ष बांधनी करताना कधीच पक्षीय हेवेदावे हे पक्षाच्या धोरणापेक्षा कधीच मोठे होवू दिले नाहीत. स्वतः च्या क्षमतेने इतरांना खूष करण्यासाठीची आपली प्रवृत्ती होती महाराष्ट्राची घडी बसवायला तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता, पण पक्षादेश शिरसावंद्य मानून त्याचा त्याग केलात. म्हणूनच आपण कॉंग्रेस पक्षात यशस्वी होवून आपला दबदबा निर्माण केला होता.

शेतकर्‍यांच्या प्रश्र्नावरील धोरणावर काम करताना आपण जी राज्यात आघाडी दाखविली आहे, ती नेत्यांना एक आदर्श असे केंद्रीत धोरण ठेवले आहे. याउलट सहकार, उद्योग व वनाचा समतोल विकास साधत सर्वाना समाजकारण व राजकारणामध्ये ही उतरण्याची संधी दिली. सर्व सामान्याच्या शिक्षण व उपजिविका याचाच फक्त भार उचलला नाही, तर बहुजन आणि वंचित समाजातील नेतृत्व पुढे यावे. याकरीता उपकारक दृष्टिकोन ठेवून तसे पक्षीय धोरण सर्वत्र राबविले, पण कॉंग्रेसमधील नव्या पिढीतील युवकामध्ये असे नेतृत्व गुण मुरायला आज किती वेळ घेणार हे काळानुसार ठरेल.

महिलांना सर्वांगिण आर्थिक विकासाच्या प्रवाहात पुढे येण्यासाठी सर्वतोपरी समर्थन दिले. त्याना समाजकारणसह राजकारणात ही नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली. पक्षीय पातळीवर महीलाना संधी देण्याचे कामही आपण केले आहे.

आपल्या कदम घराण्यातील विकासातील योगदानाची धुरा सांभाळताना कधी आपण अंतर्गत कलह होवू दिला नाही. घरातील प्रत्येकाची आवड निवड पाहत त्याच्या कामाचा कल व क्षमता पाहूनच शक्तीस्थाने बळकट करीत समाजकारण व राजकारण करण्याची योग्य ती संधी देवू केलीत. मोठ्या मनाचा दिलदार माणसाने घराला घरपण देत प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. सामाजिक सलोखा जातीक्रेंद्रित राजकीय धोरणाचा सामाजिक सलोख्यावर होणारा दुष्यपरीणाम आपणास माहीत होता, म्हणून विविध बहुजन जातीना सर्वच क्षेत्रात उतेजन देत सामाजिक एकोपा साधत आला आहात.

बहुजन कुंटुबातील पिढीला उच्च शिक्षणाची संधी देतच, आर्थिक सहाय्य केले हे सोनहिराच्या विकासाचे सर्वागीण मॉंडेल उभे केले आहे. या राजकीय धोरणामुळे पक्षीय पातळीवर आघाडीत राहून पक्षापासून आपण कधी दुरावला नाहीत. कधीही पक्षीय धोरण तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही. केवळ राजकीय नेतृत्वामुळेच विकास हा पक्षीय आधिष्ठान राहीला व सत्ता केंद्र दुय्यम ठरली. विकासाच्या नैतिक राजकारणाचा असा हा आदर्श नेता साहेबासारखा महाराष्ट्रातील कॉंग्रेसला मिळणे अवघड बनले आहे. आजच्या राजकर्ताना बळ देण्यासाठी साहेब तुमचा वरून आशिर्वाद असेल तर पुन्हा एकदा या जिल्हाला सुवर्णकाळ बघायला मिळेल, अशी आशा प्रथम पुण्यदिनी व्यक्त करतो ही आपणांस आदरांजली साहेब !!
- सदानंद माळी
कडेगांव, जि. सांगली