Breaking News

हिवराच्या शेंगांची बाधा झाल्याने ३० मेंढ्यांचा मृत्यू


कर्जत / ता.प्रतिनिधी: कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द येथील मेंढपाळ बाळू कोंडिंबा काळे यांच्या ३० मेंढ्या
हिवराच्या वाळलेल्या शेंगा खाऊन विषबाधा झाल्याने दगावल्या.शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुळधरण शिवारातील रामचंद्र लहाडे यांच्यावस्तीनजीक ही घटना घडली.

घटनेची माहिती तात्काळ पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली. पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रशांत गुंजाळ, डॉ बाळासाहेब सुपेकर, सहाय्यक पशुधन विकासअधिकारी डॉ. विलास राऊत,परिचर सदाफुले यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन बाधित झालेल्या मेंढ्यावर त्वरित उपचार सुरू केले. वेळीच उपचारझाल्याने बाधित झालेल्या ४७ मेंढ्या बचावल्या. हिवराच्या वाळलेल्या शेंगा खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याचे डॉ. प्रशांत गुंजाळ यांनी शवविच्छेदनानंतरसांगितले.

घटनेनंतर तलाठी प्रशांत जमदाडे यांनी घटनेचा पंचनामा केला. विषबाधेने २९ मेंढ्या व १ नर दगावल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे पाच लाखरुपयांचे नुकसान झाले.राक्षसवाडी खुर्दचे सरपंच रावसाहेब काळे, सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन विजय पावणे, माजी सरपंच बी.बी.काळे यांनी घटनास्थळाला भेटदिली.संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज कोपनर यांनी फोनवरून घटनेची माहिती घेतली. काळे यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेजाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लालासाहेब वारे,शेलार आदी उपस्थित होते.