Breaking News

ऐन दुष्काळात हजारो लिटर पाणी वाया


पाथर्डी (प्रतिनिधी):अभिजित खंडागळे: तालुक्यातील व शहरातील जनता पाण्यासाठी ऐन दुष्काळात वणवण भटकत असुन,नगरपालिकेमार्फत नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना देत आहेत. तर दुसरीकडे मात्र आज नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे राष्ट्रीय महामार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोरील पिण्याच्या पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असुन अद्यापपर्यत नगरपालिका प्रशासनाचा पाणीपुरवठाच्या कुठलाही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नसुन अजूनही पाणी वाया जात आहे.

पाणी वाहत जात कोरडगाव चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासुन ते शेवगाव रोडवर पर्यत पाणी वाहत गेले आहे.काटकसरीने पाणी न वापरणाऱ्या नागरिकावर कारवाई करणारे नगरपालिका प्रशासन आता सदरील हजारो लिटर पाणी वाया गेल्यानंतर कोणावर कारवाई करणार असा सवाल नागरिकांमधुन व्यक्त केला जात असुन या पाण्याच्या नासाडीबद्दल नगरपालिका प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे..