Breaking News

धारपुडीत एकनाथ षष्ठी व कालिका मातेचा रथोत्सव अभूतपूर्व उत्साहात


खटाव / सदानंद जगताप : धारपुडीचे ग्रामदैवत कालिका माताच्या ( काळूबाई ) वार्षिक यात्रोत्सवा निमित्त आयोजित पारायण,अखंड सप्ताहातिल दिं.26 रोजी सहावा दिवस होता.शांतिब्रम्ह एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधत,सकाळी सुश्राव्य किर्तन सेवेचे आयोजन होते.

दुपारी बारा वाजता एकनाथांच्या प्रतिमेवर जोशपुर्ण वातावरणात पुष्प वृष्टी करण्यात आली. व किर्तन समाप्ती नंतर ग्रामदैवताच्या रथोत्सवास अभुतपुर्व उत्साहासह सुरवात झाली .दुपारचा एक वाजुन गेला होता. ऊन्हं पायात ठिणग्याची पैजंण बाधुन नाचु लागली होती. अशातच काळुबाईच्या नावानं चांगभल चा गजर होतो.अन्ं सनई-चौघड्याच्या सुरात,ढोल ताशाच्या तालावर आणि लेझीम-घुमक्या ठेक्यात मोठ्या उत्साहात भावपुर्ण वातावरणात कालिकामाता रथोत्सवास सुरुवात होते.सोबतिला डॉंल्बीच्याआवाजाने सारे वातावरण धुंद करुन सोडल्याने,गावासह पंचक्रोशीतिल तरुणाई अंगाची लाही-लाही होत असतानाही,त्याची तमा न बाळगता,आपल्याच मस्तीत धुंद होत,देवीच्या रथासमोर नाचायला सुरवात केली.उपस्थीत सर्वच भाविकांच्या भक्तीच्या धुंणदीला नुसत उधाण आलेलं दिसत होत.जिकडे पाहवं तिकडे गुलालाचा नुसता धुरळा उडत होता.उपस्थित प्रत्येकजण गुलालाच्या रंगाने रंगुन गेले होते.धारपुडी गावच्या रथ मार्गावर सगळीककडे गुलाल आणि गुलालच दिसत होता.कालिकामातेच्या रथावर एक लाख ब्यान्नव हजार दोनसे चौवेचाळीस रुपये देणगी जमा झाल्याची माहिती यात्रा कमेटी प्रमुखानी दिली.

फाल्गुन कृ।।द्वीतीया ते फाल्गुन कृ।। सप्तमी अखेर पारायण व अखंड हरीनाम सप्ताहा निमित्त अतिशय देखणी वं आजच्या काळाला शोभेल अशी मंडप व ध्वनी व्यवस्था केल्याचे दिसत होते.त्याच बरोबर पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासुनच उपस्थित असणार्‍या ग्रामस्थासह परिसरातिल भाविक भक्तासाठी उत्पोपहार व चहाची व्यवस्था शिवाजी वामन जगताप यानी अखेरपर्यंत केली होती. त्याचप्रमाणे जेवणावळी साठी यात्रा केमिटी धारपुडी,गुलाब सुर्यवंशी, तुकाराम यादव, जनार्दन यादव, विलास नामदेव जगताप, लक्ष्मण पं.जगताप,प्रल्हाद फडतरे,हणमंत चव्हान,बबन फडतरे,सुरेश सुर्यवंशी,सदाशिव कणसे,अमोल कालिदास जगताप,शामराव फडतरे यानी अन्नदान केले.व एकनाथ षष्ठी,कालिकामाता रथोत्सवा निमित्त यात्रा कमिटीकडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्याच प्रमाणे काल्याचे किर्तनकेसरी ह . भाप . अनिल महाराज तुपे - नाशिक यांचे किर्तनाने पारायणाची सांगता झाली.
यावेळी उपस्थित सर्व भाविकांचेसाठी पोपट आनंदराव जगताप यानी काल्याचा प्रसाद म्हणुन बुंदीच्या जेवणावळीची व्यवस्था केली होती.

संपुर्ण कार्यक्रमात पोलिस बंदोबस्त न घेता, संयोजकानी एवढया मोठया कार्यक्रमास गालबोट लागेल असे कोणतेच कृत्य होवु नये याची खबरदारी घेतल्याचे प्रकर्षाने जाणवत होते . सार्‍या गावात आनंदोत्सव साजरा होतानाचे चित्र दिसुन येत होते. कालिकामाता यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, आजी -माजी सैनिक संघटना, नोकरदार संघटना,तालिम संघटना, ग्रामपंचायत, व विशेष सहकार्य ट्रॅक्टर संघटना धारपुडी आणि ग्रिनलाईन एक्सपोर्ट ऍड इंम्पोर्ट नाशिकचे मालक यानी अतिशय सुंदर व नेटके संयोजन केले होते. अशी धारपुडी पंचक्रोशीतील लोकातुन चर्चा आहे