Breaking News

कवी अमोल शिंदे यांना कलारत्न पुरस्कार


अहमदनगर/प्रतिनिधी : कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील प्रेरणा फाऊंडेशन बदलापूर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न व साहित्यरत्न पुरस्कार नगर जिल्ह्याचे प्रसिद्ध लेखक, अभिनेते, कवी अमोल शिंदे यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार रघुनाथ फडके (संचालक, मुंबई आकाशवाणी केंद्र ), प्रतिभा पाटील (जेष्ठ अभिनेत्री मुंबई), दिगंबर विशे (आमदार मुरबाड विधानसभा), राजेंद्र घोरपडे, डॉ.अविनाश म्हात्रे, डॉ मनोज पांचाळ (संस्थापक वृद्धाश्रम डोंबिवली), दीप्ती गावकर (अध्यक्षा प्रेरणा फाउंडेशन ठाणे) यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.