Breaking News

महिलादिनानिमित्त वृद्धाश्रमातील महिलांची आरोग्य तपासणी


अहमदनगर/प्रतिनिधी : विद्यार्थी समाजकार्यकर्ते व सी.एस.आर.डी. महाविद्यालय अहमदनगर यांच्या सहयोगाने शरणपुर वृद्धाश्रमात अक्षय ग्रामीण युवा क्रीड़ा व सामाजिक विकास संस्था (नेवासे फाटा) येथे जागतिक महिलादिन साजरा करण्यात आला. 

जागतिक महिलादिनानिमित्त विद्यार्थी समाजकार्यकर्ते यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून महिलांचा सन्मान म्हणून वृद्धाश्रमातील महिलांना भेट स्वरुपात जेवनाच्या ताटाचे वितरण केले. या वेळी प्रमुख उपस्थिती डॉ. मनीष पवार (स्त्री रोगतज्ञ) व डॉ.संदीप पवार तसेच वृद्धाश्रमाचे संचालक रावसाहेब मगर व सचिव सुरेखा मगर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन हर्षल आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सी.एस.आर.डी. महाविद्यालय अहमदनगरचे विद्यार्थी समाजकार्यकर्ते रवी राठोड व आजम बेग यांच्या सहयोगाने हा जागतिक महिलादिवस साजरा करण्यात आला.