Breaking News

निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे दाखले सादर करण्याचे आवाहनअहमदनगर / प्रतिनिधी : दुसर्‍या महायुध्दाच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्यात आली असून माहे मार्च 2019 पासून दरमहा रुपये 6 हजार करण्यात आलेली आहे. दुसर्‍या महायुध्दाचे निवृत्तीवेतन घेणार्‍या माजी सैनिक विधवांना वाढीव फरकाच्या रकमेची मागणी सैनिक कल्याण विभागाकडे करण्यात येणार आहे.
दुसर्‍या महायुध्दाचे निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला 25 मार्चपर्यत बँक मॅनेजर यांची स्वाक्षरी घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर येथे जमा करण्यात यावे.
ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त होणार नाहीत. त्यांना फरकाची रक्कम व चालू निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार नाही, असे आवाहन अहमदनगर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.