Breaking News

पराभव दिसत असल्यामुळेच मोदींकडून मिशनशक्ती


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयांशी संवाद साधत एलईओ मिसाईलबद्दल सांगितले. हा सगळा मोदींचा नवीन जुमला असून आम्ही त्यांचा निषेध करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

‘डिफेन्स मधल्या गोष्टींची सिक्रसी असायला हवी. मोदींनी वैज्ञानिकांनी केलेलं काम जगासमोर आणले आहे. अँटि मिसाईल टेक्निक जगासमोर आणले. 5-6 वर्षांपूर्वी चीनने सुद्धा असं सॅटेलाईट पाडलं होतं. तेव्हा जगाने ते अ‍ॅक्नॉलेज केलं. कोणत्याही पंतप्रधानाने अशा प्रकारे मिसाईल डागल्याचं जाहीर केलेलं नाही. हा सर्व मोदींचा जुमलाचं’ असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसंच‘ डिफेन्सचे संशोधन वेळ आल्यावरच वापरलं जातं तेव्हा ते जगासमोर येतं. पण मोदींनी ते जाहीर करून टाकले. हा सरप्राइज एलिमेंट असायला हवा होता. पण भाजपची समोर दिसत असलेली हार विजयामध्ये बदलण्यासाठी मोदींनी ते जाहीर केले’ असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. आचारसंहितेच्या काळात अशाप्रकारची घोषणा करताना कुठलीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

‘आम्ही हेलिकॉप्टर वापरू शकत नाही का?

प्रकाश आंबेडकर लातूरच्या सभेला हेलिकॉप्टरने गेले होते त्यावरुन राजकारणं झाले. त्याचसोबत त्याच्यावर टीका करत प्रश्‍न उपस्थित केले गेले होते. त्यावर बोलताना त्यांनी असं सांगितले की, ‘अशोक चव्हाण किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुद्र मानसिकता दाखवली आहे. राज्यातल्या सर्व मतदारसंघातून जाण्यासाठी 20 दिवसांसाठी आम्ही भाड्याने हेलिकॉप्टर घेतलंय. पुण्यातल्या मांडके अ‍ॅण्ड मांडके कंपनीसोबत करार त्याबाबत झाला आहे. भारिपच्या पक्ष निधीतून त्याचा पैसा जाणार आहे. ज्यांना वाटतं आम्हीच फक्त हेलिकॉप्टर वापरू शकतो, बाकीच्यांनी बैलगाड्यातच फिरावं, त्यांनी शुद्र मनोवृत्तीचं दर्शन घडवलं’ असल्याचा आरोप आंबेडकरांनी केली आहे.