Breaking News

जयहिंद लोकचळवळचा आदर्श गाव अभ्यास दौरा


संगमनेर/प्रतिनिधी: ग्रामस्थांची एकजुट लोकसहभाग, लोकवर्गणी, श्रमदान, शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे या त्रिसुत्रीच्या जोरावर कोणत्याही गावाचा सर्वांगिण विकास सहज शक्य होत असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत दळवी (माजी विभागीय आयुक्त पुणे विभाग) यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (अनिवासी भारतीय व्हायस प्रिसिडेंट ग्लोबल इन्फोटेक सोल्युशन प्रा.लि. कंपनीचे किशोर गोरे ,जयहिंद लोकचळवळ आयोजीत आदर्श गाव निढळ अभ्यास दौरा त्यांच्या सोबत सगंमनेर तालुक्यातील आसपासच्या चार-पाच गावातील 50 ते 55 सदस्य, विविध स्थानिक स्वराय संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ हे निढळ गावची पहाणी करण्यासाठी आले होते.

त्यानंतर सर्व मान्यवरांना निढळच्या पाणलोट प्रकल्पाच्या क्षेत्रात घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व उपस्थितांना पाणलोट, जलसंधारण या विषयावर सखोल माहीती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने निढळमध्ये राबवलेला नाबार्डचा इंडो जर्मन वॉटर शेड प्रकल्प कशा प्रकारे राबविण्यात आला. डोंगराच्या माथा ते पायथा केलेल स्टोन बंडीग, सी.सी.टी. त्यानंतर गावाच्या परिसरात डीप.सी.सी.टी. ओढ्यावरचे सिमेंटचे बंधारे, जुने, माती नाला बांध दुरुस्ती इत्यादी स्ट्रक्चर प्रत्यक्षात उपस्थितांना दाखवण्यात आली.

यावेळी किशोर गोरे म्हणाले की, मी परदेशात गेलो आज ग्लोबल इन्फोटेक सोल्युशन प्रा.लि.कंपनीच्या मार्फत नगरमधुन 40 देशात विखुरलेल्या 400 ते 450 लोकांना भुमिपुत्रांना एकत्र करुन आपण आपल्या जन्मभुमीचा कायापालट करायचा निश्‍चय पहिल्यापासूनच आहे. अमेरीकेमध्ये जरी रहात असलो, तरी मी भारतीय संस्कृतीचाच आणि भारतीयच असल्याची जाणीव मला वेळोवेळी होते.