Breaking News

दहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी? बंडखोरांना "कुमक" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना!कुमार कडलग /नाशिक
नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून दृढ झाला आहे.हा दृढ समज इतिहास म्हणून प्रत्येक निवडणूकीच्या वेळी समोर आणला जातो.माञ त्यामागची कारण मिमांसा करण्याची तसदी घेतली जात नाही.या मालिकेच्या पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे नाशिककरांची विकासाची भुक वेगळी आहे.नाशिककरांना यशवंतरावांच्या विकासाचा वारसा सांगणारा लोकप्रतिनिधी खर्या अर्थाने लाभला तर एकदा काय चारदा खासदार रिपीट होऊ शकतो,सांगायचे तात्पर्य एव्हढेच की,नाशिककरांना सांगितला जात असलेला समज इतिहास आहे,आणि इतिहास बदलता येतो.माञ त्यासाठी प्रामाणिक इच्छा शक्तीची गरज आहे.अर्थात या माध्यमातून संभाव्य निकालावर भाष्य करायचे नाही.माञ यंदाच्या निवडणूकीत शक्यतांचा ठोकताळा मांडण्याचा नक्कीच प्रयत्न आहे.


नाशिक लोकसभा मतदार संघात होणारी निवडणूक दुरंगी नक्कीच असणार नाही .या क्षणी चौरंगी होणार हे स्पष्ट झालेच आहे.प्रसंगी आणखी एखाद दुसर्या उमेदवाराची भर पडून पंचरंगीही होऊ शकते.
पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे समीर भुजबळ,शिवसेना भाजप युतीचे हेमंत गोडसे आणि बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार हे तीन उमेदवार रिंगणात आहेत.नारायण राणेंचे खंदे समर्थक आणि त्यांच्या आधी भाजपात गेलेले सिन्नरचे माजी आ.माणिकराव कोकाटे हे देखील दंड ठोकून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.या शिवाय मराठा क्रांती मोर्चातून पुढे आलेले एखादे तरूण नेतृत्व ऐनवेळी मैदानात उतरविला जाऊ शकतो.या एकूण परिस्थितीवरून यंदा होणार्या पंचरंगी लढतीचा फटका आघाडी आणि युतीच्या अधिकृत उमेदवाराला बसून अनपेक्षित निकाल लागू शकतो.

आघाडी आणि युतीच्या उमेदवारांना मिळणार्या मतांची विभागणी व्हावी म्हणून विजयाच्या स्पर्धेत नसलेल्या अन्य तीन उमेदवारांना बळ देण्याचे काम आघाडी आणि युतीचे थिंक टँक करू शकतात.किंबहूना तशी रणनिती तयार झाल्याची चर्चा आहे.स्पष्टच बोलायचे झाले तर वंचित आघाडीने नाशिक लोकसभा लढवायची नाही असे आधी जाहीर करताना छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची अट घातली होती.तथापी राष्ट्रवादीने समीर भुजबळ यांना उमेदवारी दिल्याने वंचित आघाडीने उमेदवार उभा केला आहे.सोबत बहुजन समाजवादी पक्षानेही वंचित आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा असल्याने वंचित आघाडीला मिळणारी मते एरवी कुणाला पडले असते? हे वेगळे सांगायची गरज नाही.वंचित आघाडीत एमआयएम,भारिप बहुजन संघ आणि बहुजन समाज वादी पक्ष सहभागी आहे.याचाच अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी मिञपक्षाच्या आघाडीला मिळणारी मते वंचित आघाडीकडे वळविण्याची खेळी आहे.दुसर्या बाजूला सिन्नरचे माजी आ.माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी केल्यास शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसू शकतो.याशिवाय मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीतून पुढे आलेले एखादे नाव मैदानात आल्यास त्याचाही फटका शिवसेनेला बसू शकतो.प्रमुख लढतीत असलेले दोन प्रतिस्पर्धी उमेदवार या मतविभागणीच्या खेळीला धुनी देण्यासाठी प्रयत्नशील असले तर नवल नाही.एकूणच अपक्ष आणि वंचित आघाडीचे उमेदवार विजयाचे गणित बिघडविणार असल्याने धक्कादायक निकाल अपेक्षित आहे.

सन २००९च्या लोकसभा निवडणूकीत समिर भुजबळ आणि हेमंत गोडसे अशी लढत झाली होती.त्यावेळी राष्ट्रवादीचे भुजबळ,शिवसेनेचे दत्ता गायकवाड आणि मनसेचे हेमंत गोडसे अशी तिरंगी लढत होऊन भुजबळ गायकवाड अशा सुरूवातीला वाटणार्या लढतीने अचानक रंग बदलला आणि शिवसेनेचे गायकवाड तिसर्या क्रमांकावर फेकले जाऊन मनसेचे गोडसे यांनी भुजबळांशी लढत दिली,

गोडसे पराभूत झाले त्याला शिवसेना मनसेत झालेली मतविभागणी कारणीभूत ठरली होती.पाच वर्षानंतर गोडसे यांनी पराभवाचा बदला घेतला.दहा वर्षानंतर पुन्हा हे दोन्ही उमेदवार समोरासमोर उभे ठाकले असून तशीच मतविभागणी होऊन धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.अशो मतविभागणी व्हावी ही दोन्ही बाजूच्या धुरिणांची इच्छा असून बंडखोरांना सर्व प्रकारची कुमक पुरविण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.