Breaking News

सर्वसामान्यांची पत जोपासणारी पतसंस्था- अ‍ॅड.दुसुंगे


पारनेर/प्रतिनिधी
काबाडकष्ट करणारा शेतकरी वर्ग व सर्वसामान्याची हित जोपासणारी राजीव गांधी पतसंस्था एका भव्य आकर्षक वास्तूमध्ये स्थलांतर होत असून नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात या पतसंस्थेने नावलौकीक मिळवले असून हे सारे तुमच्यामुळेच शक्य झाल्याचे असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.उध्दवराव दुसुंगे यांनी केले.
कामरगाव ता. नगर येथील राजीव गांधी प्रतसंस्थेचे स्थलांतर कार्यक्रम शनिवार दि.16 रोजी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून दुसुंगे बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते सबाजीराव गायकवाड, कामरगावचे सरपंच वसंतराव ठोकळ, उपसरपंच अनिल आंधळे, माजी सरपंच रावसाहेब साठे, चासचे माजी सरपंच पोपटराव घुंगार्डे, सामाजिक कार्यकर्ते शामराव आंधळे, साहेबराव आंधळे, राजीव


गांधी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक शंकर भोगाडे, बापू ठोकळ, शाखाधिकारी शरद पवार, पत्रकार शरद रसाळ, राजेंद्र रसाळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना दुसुंगे म्हणाले की, संस्थेचा विस्तार वाढविला असून शहरात सव्वा एकर जागा खरेदी केली आहे. भविष्यात या ठिकाणी मुख्य कार्यालय बांधण्यात योणार आहे. अहमदनगरमध्ये पिढ्या न पिढ्या चालणारी एकमेव संख्या म्हणजे राजीव गांधी पतसंस्था संस्थेचे कर्ज देतांना उद्योगपतींना न घेता शेतकरी व प्रामाणिक गरजूवंतांना कर्ज दिले जाते. तो प्रामाणिक असतो, उद्योग करणारा शेतकर्‍यांचा मुलगा असेल तर त्यांना कर्ज वाटप केले जाते. तुम्ही ठेवलेल्या ठेवींचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. वेळेत कर्ज भरल्यास संस्था सदैव तुमच्या पाठीशी उभी राहणार असल्याचेही दुसुंगे यांनी सांगितले. यावेळी शाखा कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.