Breaking News

एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षदी नवनाथ शेंडे


दहिवडी / प्रतिनिधी : येथील एसटी आगारातील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी नवनाथ शेंडे यांची निवड करणेत आली. विभागीय सचिव शिवाजीराव देशमुख, यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत सर्वानुमते श्री. शेंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी सचिवपदी विष्णू पोळ, कार्याध्यक्षपदी धनाजी गोरे, उपाध्यक्षपदी वैभव पवार, विभागीय प्रतिनिधीपदी लाडुताई मडके, सहसचिवपदी संजय बोराटे, कार्यकारीणी सदस्यपदी प्रभाकर भोजने, अजितकुमार काटकर यांच्याही निवडी करण्यात आल्या.

यावेळी बोलताना नुतन अध्यक्ष शेंडे यांनी कामगारांचे प्रलंबीत प्रश्र्न समन्वयातून सोडविण्याची ग्वाही दिली. तसेच आपल्या कार्यकालात जास्तीत जास्त सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. या निवडीबदद्दल आ. जयकुमार गोरे, अर्जुनराव काळे, अरुण गोरे, दादासाहेब काळे, नगरसेवक सतिश जाधव, सरपंच वामनराव जाधव, वारकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष बोराटे तसेच बिदाल, आंधळी, परिसरातील विविध मान्यवरांनी श्री. शेंडे व सहकार्‍यांचे अभिनंदन केले.